
MRUNMAYEE DESHPANDE
esakal
मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट ‘तू बोल ना’ हा चित्रपट आता नव्या नावानं, नव्या उत्साहात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट येत्या गुरुवारी, १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. याआधी या चित्रपटाचे नाव ‘मना’चे श्लोक’ असं होतं. सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिल्यानंतरही काही संघटनांच्या वतीने चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न केला गेला.