

mugdha vaishampayan swim in saree
esakal
आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय मराठमोळी गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन. 'सारेगमप लिटिल चॅम्प' मधून ती घराघरात पोहोचली. तिचा आवाज जितका लोकप्रिय ठरला तितकाच तिचा स्वभावही प्रेक्षकांना भावला. मुग्धा पुन्हा चर्चेत आली ती प्रथमेश लघाटेसोबत लग्न केल्यानंतर. आपली लिटिल मॉनिटर इतकी मोठी झाली यावर अनेकांना विश्वास बसत नव्हता. आता पुन्हा एकदा मुग्धा चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. त्याचं कारण मात्र वेगळंच आहे. नुकतेच गणपती येऊन गेले. आता मुग्धाने गणपती विसर्जनाचा एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात ती साडी नेसून नदीत पोहोताना दिसतेय.