
Bollywood News : 2013 साली रिलीज झालेला अभिनेता अयान मुखर्जीचा ये जवानी है दिवानी हा सिनेमा खूप गाजला. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. आज बारा वर्षांनंतरही हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या सिनेमात रणबीरने साकारलेलं बनी हे कॅरेक्टर प्रेक्षकांना भावलं. पण तुम्हाला माहितीये का ? या सिनेमातील कबीर किंवा बनीच्या भूमिकेसाठी रणबीर हा अयानची पहिली निवड नव्हता. अयान मुखर्जीने हा सिनेमा दुसऱ्याच एका अभिनेत्यासाठी लिहिला होता.