
Bollywood Entertainment News : शक्तिमान, महाभारत या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेलं अभिनेते मुकेश खन्ना कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. बॉलिवूडवर काही ना काही कारणांमुळे टीका करणाऱ्या मुकेश खन्ना यांनी नुकतंच शक्तिमान सिनेमाविषयी वक्तव्य केलं. रणवीर सिंहला ही भूमिका साकारण्यामागे नकार देण्याचं कारण त्यांनी सांगितलं.