विठ्ठलभक्तांसाठी खास भेट! श्रद्धा अन् आत्मशोधाचा प्रवास उलगडणारे 'मुक्काम पोस्ट पंढरपूर' लवकरच रंगभूमीवर

MUKKAM POST PANDHARPUR: रंगभूमीवर रंगणार ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’चा भावस्पर्शी प्रवास. विठ्ठलभक्ती, श्रद्धा आणि आत्मशोधाचा प्रवास उलगडणार!
mukkam post pandhari

mukkam post pandhari

esakal

Updated on

आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने एका नव्या आणि आशयघन नाटकाची घोषणा करण्यात आली आहे. ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, श्रद्धा, अध्यात्म आणि जीवनप्रवास यांचा वेध घेणारी ही कलाकृती असल्याची उत्सुकता पहिल्या पोस्टरमधूनच निर्माण झाली आहे. ‘पंढरीची वाट संपत नाही… ती प्रत्येक पावलागणिक नव्याने सुरू होते.’ या आशयपूर्ण ओळींसह प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये एका प्रवाशाचा पंढरीच्या दिशेने सुरू असलेला प्रवास आणि विठ्ठलाच्या विराट रूपाचे प्रतीकात्मक दर्शन घडते. त्यामुळे हे नाटक केवळ पंढरपूरच्या वारीपुरते मर्यादित न राहाता, प्रत्येकाच्या अंतर्मनातील श्रद्धा, संघर्ष आणि आत्मशोधाचा प्रवास मांडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com