

mukta barve
ESAKAL
'मुंबई पुणे मुंबई', 'मंगलाष्टक वन्स मोअर', 'डबल सीट' यांसारख्या दमदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी मुक्ता बर्वे प्रेक्षकांची आवडती आहे. तिचा असा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. मराठी सिनेसृष्टीतील अतिशय ताकदीची अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. गेली २५ वर्ष आपल्या अभिनयाच्या जोरावर ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. चित्रपट, नाटक, मालिका अशा तीनही क्षेत्रात तिने स्वतःचं स्थान कायम केलंय. मात्र यशाच्या शिखरावर असूनही ती वैयक्तिक आयुष्य प्रेक्षकांपासून दूर ठेवणंच पसंत करते. वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता अविवाहीत आहे. आता तिने यावर स्पष्ट भाष्य केलंय.