

mukta barve
esakal
'मुंबई पुणे मुंबई' मधून प्रत्येकाच्या मनात घर करणारी लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. तिने अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलंय. ती मराठी सिनेसृष्टीतील एक कसलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पुण्यात जन्मलेल्या मुक्ताने ललित कला केंद्रातून अभिनयाचं शिक्षण घेतलंय. तिने रंगभूमीही गाजवलीये. नुकताच मुक्ताचा 'असंभव' हा थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झालाय. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या स्वप्नांबद्दल सांगितलंय.