अभिनेता मुकुल देव यांचं शनिवारी म्हणजेच 24 मे रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे भाऊ राहुल देव यांनी सोशल मीडियाद्वारे दिली. मुकुल देव यांच्या जाण्याने संपुर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली होती. दरम्यान आता मुकुल देव यांचा निधनापूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. कारण या व्हिडिओमध्ये मुकुल देव यांची परिस्थिती बघून चाहत्यांना प्रश्न पडलाय की, हे मुकुल देव आहेत की दुसरं कोणी?