

सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांना घटनास्थळावरून चाकूचा दुसरा भाग सापडला आहे. सैफ अली खानच्या पाठीत चाकूचा एक भाग अडकला होता, जो डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे काढला होता. चाकूचा हा भाग हल्ल्याच्या दिवशीच पोलिसांना सापडला होता. पोलिसांना या भागातून बोटांचे ठसे मिळाले आहेत.