
भारताचा सन्मान उंचावत मुंबईची 12 वर्षांची वंशी मुदलियार हिने गोल्डन क्लासिकल म्युझिक अवॉर्ड्स – टोकियो 2025 मध्ये गोल्ड फर्स्ट प्राईज पटकावला. तिने 20 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध टोकियो ओपेरा सिटी कॉन्सर्ट हॉल येथे लाईव्ह गायन करून सर्वांना प्रभावित केले. ही कामगिरी गेल्या वर्षीच्या व्हिएन्ना इंटरनॅशनल आर्ट्स फेस्टिव्हल (2024) मधील सिल्व्हर मेडल जिंकल्यानंतरची आहे. त्यामुळे वंशी ही युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांमध्ये सलग मोठी पारितोषिके जिंकणारी सर्वात कमी वयाची भारतीय कलाकार ठरली आहे.