
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणवले जाणारे राजेश खन्ना यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. बॉलिवूडचे काका असणारे राजेश खन्ना यांच्यासाठी मुली अक्षरशः वेड्या होत्या. कित्येक चाहत्या त्यांच्या नावाचं कुंकू लावायच्या. मात्र त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची कायम चर्चा होते. त्यांच्या आणि डिंपल कपाडियाच्या अचानक झालेल्या लग्नाने सगळ्यांना धक्का बसला होता. आता अभिनेत्री मुमताज यांनी त्यांच्याबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.