

munmun dutta
esakal
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री मुनमुन दत्ता अजूनही बबिताजी बनून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तारक मेहताचे चाहते तिला बबिता म्हणूनच ओळखतात. तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावलंय. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. मुनमुन सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती नेहमीच तिच्या आयुष्यातील सुंदर घटना आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आताही तिने असाच एक सुंदर व्हिडिओ शेअर केलाय जो पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.