
MUNNABHAI MBBS
ESAKAL
'मुन्नाभाई एम बी बी एस' या चित्रपटाने अभिनेता संजय दत्त याला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. या चित्रपटामुळे तो घराघरात पोहोचला. या चित्रपटातून अनेक कलाकारांना ओळख मिळाली. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे विशाल ठक्कर. विशालने चित्रपटात विष प्यायलेल्या मुलाची भूमिका साकारली होती. गर्लफ्रेंड नाही म्हणते म्हणून तो विष पितो आणि त्याची आई त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते अशी ती भूमिका होती. या चित्रपटानंतर विशाल अनेक मालिकांमध्येही झळकला. मात्र गेली १० वर्ष तो बेपत्ता आहे. तो कुठे गेला, त्याचं काय झालं याबद्दल कुणालाही काही ठाऊक नाही. मात्र शेवटचा तो चित्रपट पाहायला गेला होता.