
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत एक नाव आवर्जून घ्यावं लागेल ते म्हणजे 'मुरांबा' मालिकेचं. ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. सुरुवातीला रमा आणि अक्षय यांच्या प्रेमकहाणीत रेवा मुख्य खलनायिका होती. मात्र आता माही त्यांच्यामध्ये काटा बनताना दाखवण्यात आली होती. त्यानंतर अक्षयच्या आत्याने त्यांच्या विरोधात कारस्थान करून त्यांना वेगळं केलंय. ते पुन्हा एकत्र कसे येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच मालिकेच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिलाय. ही मालिका आता ७ वर्षांची लीप घेणार आहे.