जा रमा जा, तुझ्या अक्षयकडे! अखेर रमाक्षय एकत्र येणार; 'मुरांबा' मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक खुश; म्हणतात-

MURAMBA SERIAL NEW PROMO: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'मुरांबा' मध्ये आता नवीन ट्विस्ट आलाय. अखेर रमा आणि अक्षय एकत्र येणार आहेत.
muramba serial

muramba serial

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. त्यातील कलाकार देखील प्रेक्षकांना आपल्यातलेच एक वाटतात. या कलाकारांच्या आयुष्यात चांगलं होत राहावं असं त्यांना वाटतं. मात्र मालिका चालवायची असेल तर नायक आणि नायिकेचं आयुष्य अगदी साधं सोपं करून कसं चालेल. त्यामुळेच मालिकेत नवनवीन ट्विस्ट आणले जातात. असाच ट्विस्ट आता स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेत आलाय. 'मुरांबा' ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. त्यातील रमा आणि अक्षय यांची जोडीही प्रेक्षकांची आवडती आहे. ते दोघे एकत्र येण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर त्यांची प्रतीक्षा संपलीये. रमा आणि अक्षय एकत्र येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com