

myra vaikul parents decision
esakal
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळ हिने तिच्या निरागसतेने सगळ्यांची मनं जिंकली. मायरा प्रेक्षकांची अत्यंत लाडकी बनली. लहान असल्यापासूनच तिचे आईवडील तिचे गाण्याचे आणि डान्सचे व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करत. त्यामुळेच तिला इंस्टाग्रामवरही प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मात्र 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून तिने प्रेक्षकांच्या मनात घरत केलं. मात्र या प्रसिद्धीचा तिला फायदा झाला तितकाच त्रासही झाला. आता तिच्या पालकांनी तिच्या भविष्यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय.