

अलीकडेच अनेक कलाकारांनी स्वतःचं हक्काचं घर घेतलं. मुंबईत आपलं घर असावं असं प्रत्येकालाच वाटतं. मात्र आता घरासोबतच फार्महाऊसची संकल्पनाही बऱ्यापैकी वाढतेय. अनेक कलाकारांचं शहरांपासून दूर स्वतःचं असं फार्महाऊस आहे. जिथे ते सुट्ट्या घालवण्यासाठी जातात. प्राजक्ता माळी, मृण्मयी देशपांडे, अवधूत गुप्ते यांसारख्या कलाकारांच्या यंदाची आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलंय. आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मधुगंधा कुलकर्णी. तिने आणि पती, दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी मिळून स्वतःचं फार्महाऊस बांधलं आहे.