
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू यांनी घटस्फोट घेतल्यावर अनेक चाहत्यांची मनं दुखावली गेली. त्यानंतर अनेकांनी नागा चैतन्य याला या घटस्फोटासाठी जबाबदार धरलं. मात्र आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने यावर भाष्य केलंय. मी एका तुटलेल्या कुटुंबातून आलोय त्यामुळे एखादं नातं तोडण्यापूर्वी मी १०० वेळा विचार करेन असं तो म्हणालाय. नागा चैतन्यचा 'तांडेल' हा चित्रपट सध्या खूप गाजतोय. या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्याने घटस्फोटाबद्दल मौन सोडलंय.