
Bollywood Entertainment News : साउथ चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेता नागार्जुन यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत दक्षिणेकडील चित्रपट बॉलिवूडपेक्षा अधिक चांगले करत आहेत, हा दावा योग्य नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. सिनेसृष्टीतील चढ-उतार हे सामान्य प्रक्रिया असल्याचं त्यांनी नमूद केलं आणि सध्या सुरू असलेल्या ‘बॉलीवूड विरुद्ध साउथ’ या चर्चांना एका परिपक्व दृष्टिकोनातून उत्तर दिलं.