
प्रसिद्ध अक्किनेनी कुटुंबात पुन्हा एकदा लग्नाची धामधूम जोरात सुरू आहे. नागा चैतन्यनंतर, आता त्याचा भाऊ अखिल अक्किनेनीच्या लग्नाची वेळ आली आहे. लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनच्या धाकट्या मुलाने नोव्हेंबर २०२४ मध्ये झैनब रावजीशी त्याची साखरपुडा जाहीर केला होता, त्यानंतर त्याच्या भावाचं नागा चैतन्यचं लग्न ४ डिसेंबर २०२४ रोजी झालं. बऱ्याच प्रतीक्षेनंतर, अखेर तो दिवस आला आहे. अखिल आणि झैनाब यांनी ६ जून २०२५ रोजी लग्नगाठ बांधली. अशातच या लग्नात मुलाच्या वरातीत नागार्जुनने केलेला डान्स आता चर्चेचा विषय बनलाय.