

Tighee Nagpur Show
esakal
Marathi Entertainment News : जीजिविषा काळे दिग्दर्शित 'तिघी' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रेम मिळत आहे. नात्यांच्या गुंतागुंतीतून उलगडणारी आई- मुलींची भावनिक कथा आणि वास्तववादी मांडणी यामुळे 'तिघी'ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. तीन वेगवेगळ्या स्त्रियांच्या आयुष्याभोवती फिरणारा हा चित्रपट त्यांच्या नात्यांमधील भावविश्व, संघर्ष, स्वत्वाचा शोध आणि एकमेकींशी असलेला अदृश्य बंध यावर आधारित आहे. स्त्रीमनाचा सूक्ष्म वेध घेत, आयुष्यातील छोट्या-छोट्या भावनिक क्षणांना प्रभावीपणे मांडणारा हा चित्रपट अनेकांना आपलासा वाटत आहे.