
नागपूरः दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमातील अभिनेता प्रियांशू क्षत्रिय ऊर्फ बाबू छपरी याचा जुन्या भांडणातून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (ता.७) मध्यरात्री १२ ते १ वाजतादरम्यान जरीपटक्यातील नारा येथील गजानननगरी परिसरात घडली. प्रियांशूने बहुचर्चित ‘झुंड’ सिनेमात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.