
नागपूर : उपराजधानीत तयार झालेल्या ‘आबरू’ या लघूपटाने गत सहा महिन्यात इतिहास घडविला आहे. या लघूपटाची तेरा राज्यातील फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली. गोवा, मुबई, पारंबी फिल्म फेस्टिवलमध्ये निर्मिती जीवनतारे यांना दिग्दर्शनाचे पुरस्कार मिळाले, तर मंगळवारी ‘आबरु’ लघुपटाची मलेशिया देशात ‘क्वालालंपूर येथे होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाल्याचे कळविण्यात आले.