नागराज मंजुळे दिग्दर्शित मटका किंग सिरीजची रिलीज डेट जाहीर ! विजय वर्मा साकारणार मुख्य भूमिका

Nagraj Manjule Directed Web Series Matka King Release Date Announced : नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन असलेल्या मटका किंग या सिनेमाची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली. जाणून घेऊया या नव्या सिरीजविषयी.
Nagraj Manjule Directed Web Series Matka King Release Date Announced

Nagraj Manjule Directed Web Series Matka King Release Date Announced

esakal

Updated on

Entertainment News : प्राइम व्हिडिओ, जो भारतातील सर्वात लोकप्रिय एंटरटेनमेंट डेस्टिनेशन आहे, त्याने आज विजय वर्माच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आगामी ओरिजिनल ड्रामा सीरिज ‘मटका किंग’ची वर्ल्डवाइड प्रीमियर डेट 17 एप्रिल जाहीर केली आहे. अभय कोरन्ने यांनी लिहिलेली आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी तयार करून दिग्दर्शित केलेली ही सीरिज 1960 च्या दशकातील बदलत्या बॉम्बेवर आधारित आहे. ही कथा एका कापूस व्यापाऱ्याभोवती फिरते, जो ‘मटका’ नावाची नवी जुगार प्रणाली सुरू करतो आणि श्रीमंतांच्या या छंदाला संपूर्ण देशभर पसरवतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com