
सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात काही व्हिडिओ आपल्याला धक्का देणारे असतात तर काही व्हिडिओ प्रेक्षकांना निखळ आनंद देणारे असतात. काही व्हिडिओ पाहून आपण दुःख व्यक्त करतो तर काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात कलाकारांचा एक ग्रुप 'काळूबाईचं वारं माझ्या भरलं अंगात गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसतोय. या ग्रुप दुसरा तिसरा कुणी नसून आपल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या कलाकारांचा आहे.