

NAMRATA SAMBHERAO DANCE
ESAKAL
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अनेक दमदार कलाकार दिले. ज्यांनी आपल्या टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. वनिता खरात, ओंकार भोजने, गौरव मोरे, प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, दत्तू मोरे, पृथ्वीक प्रताप यांसारख्या कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. यातील एक अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नम्रता प्रेक्षकांची अत्यंत आवडती आहे. प्रत्येक स्किटमध्ये ती वेगळ्या भूमिकेत दिसते. तिची जॉली तर प्रेक्षकांची आवडती आहे. नम्रता केवळ एक अभिनेत्रीच नाही तर एक उत्कृष्ट नृत्यांगणा देखील आहे. तिचा डान्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.