

nana patekar left event
esakal
मराठमोळे अभिनेते पाटेकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलंय. मराठी असो किंवा हिंदी, चित्रपट असो किंवा वेबसीरिज नानांनी कायमच आपलं १०० टक्के दिलंय. नाना त्यांच्या नियमांसाठी आणि वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. ते कायमच त्यांची मतं मोकळेपणाने मांडतांना दिसतात. मात्र सध्या नाना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. नानांचा 'ओ रोमिओ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र आज मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा होता. मात्र या सोहळ्यात असं काहीतरी घडलं ज्यामुळे नाना कार्यक्रमाच्या आधीच तिथून निघून गेले.