
मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर 'वनवास' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या या चित्रपटाचं चांगलंच कौतुक होतंय. नाना यांनी कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. आताही नाना सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ते अभिनेता आमिर खानसोबत दिसतायत. यात त्यांनी धोतर सदरा घातला आहे.