
नाना पाटेकर हे रंगभूमीबरोबरच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रतिष्ठित आणि लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांची अभिनयक्षमता आणि विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याची शैली यामुळे ते प्रत्येक प्रेक्षक गटात लोकप्रिय झाले आहेत. 'तिरंगा', 'परिंदा', 'क्रांतीवीर', 'वेलकम', ‘पक पक पकाक’ आणि 'नटसम्राट' यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांच्या अभिनयाने अनेकांना प्रभावित केले आहे.