
बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांचा नवा चित्रपट 'वनवास' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नानांनी दिलेल्या मुलाखतीत व्हायरल होत आहेत. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि नाना चांगले मित्र होते. यापूर्वीही आपण स्मिता पाटील यांच्यामुळे इंडस्ट्रीमध्ये आलो असं त्यांनी सांगितलं होतं. आता एका मुलाखतीत नानांनी स्मिता यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितलाय जेव्हा त्या नाटकाच्या प्रयोगाला येऊन रडू लागल्या होत्या.