
मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर आजही प्रेक्षकांचे आवडते आहेत. अभिनयाच्या बाबतीत ते भल्याभल्यांना मात देतात. ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. नानांनी नुकतीच 'कौन बनेगा करोडपती १६' मध्ये हजेरी लावली. नाम फाउंडेशनसाठी ते या खेळात सहभागी झाले. त्यांचा वनवास हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने केबीसी १६ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी खूप गप्पा मारल्या. यात त्यांनी त्यांच्या गावच्या घराबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.