
लोकप्रिय दिग्दर्शक लक्षण उतेकर यांच्या 'छावा' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. या' चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मात्र त्यातील एका दृश्यावरून नवीन वाद सुरू झालेला. आता तो वाद मिटला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय. नुकतंच या चित्रपटाचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. आणि या गाण्यात प्रेक्षकांना एक मोठं सरप्राइज देखील पाहायला मिळतंय.