
लोकप्रिय मराठी आणि बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. त्यांचा नवा चित्रपट 'वनवास' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात नाना पाटेकर यांच्यासोबत उत्कर्ष शर्मादेखील आहे. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकलेला नाही. २० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये. पहिल्या दिवसात हा चित्रपट १ कोटीची कमाई देखील करू शकलेला नाही.