
बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. त्यांनी ९०चा काळ तर गाजवलाच. सोबतच २० व्या शतकातही त्यांच्या अभिनयाला कुठेही ब्रेक लागलेला नाही. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात ते निरनिराळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतात. सध्या नाना यांची एक मुलाखत व्हायरल होतेय ज्यात ते कारगिल युद्धाबद्दल आणि काश्मीरबद्दल बोलताना दिसतायत.