

LAGNANATAR HOILCH PREM UPCOMING EPISODE
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये दररोज निरनिराळे ट्विस्ट येत असतात. त्यामुळेच प्रेक्षक मालिकेशी जोडलेले राहतात आणि मालिकेचा टीआरपी वाढतो. असाच एक मोठा ट्विस्ट आता स्टार प्रवाहवरील मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये येणार आहे. मालिकेत आता नंदिनी आणि जीवाचं सत्य सगळ्यांसमोर उघड होणार आहे. वसू आत्या नंदिनीचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे. नुकताच स्टार प्रवाहाने नवा प्रोमो प्रदर्शित केलाय. जो पाहून प्रेक्षक आनंदले आहेत.