
trisha thosar kamal hassan
ESAKAL
नुकताच ७१ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. यात शाहरुख खान , राणी मुखर्जी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. मात्र सध्या यांच्यापेक्षाही जास्त चर्चा होतेय ती ६ वर्षांच्या चिमुकलीची. त्रिशा ठोसरची. त्रिशाने वयाच्या ६ व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलाय. त्यामुळे तिच्यावर चाहत्यांसोबतच कलाकारांकडूनही कौतुकाचा वर्षाव करण्यात येतोय. चिमुकली त्रिशा चक्क साडी नेसून या सोहळ्याला पोहोचली होती. तिच्या या सोज्वळपणाचं देखल प्रचंड कौतुक झालं. आता तिचं कौतुक करण्यासाठी चक्क कमल हासन यांनी तिला व्हिडिओ कॉल केला होता.