
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर सध्या चर्चेत आहेत ते शोले सिनेमाबद्दल केलेल्या विधानामुळे. शोले सिनेमात गब्बर सिंगची भूमिका साकारणाऱ्या अमजद खान यांना सिनेमातील डायलॉग बोलायला त्यांनी शिकवलं असा खुलासा त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यावरून अनेकांनी सचिन यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांची नाराजी जाहीररीत्या व्यक्त केली.