जीजी झाली मॉडर्न! 'येड लागलं प्रेमाचं' मधून एक्झिट घेताच नव्या मालिकेत दिसणार नीना कुळकर्णी; नेटकरी चकीत

NEENA KULKARNI MODERN LOOK :काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची एका मालिकेतून एक्झिट झाली होती. आता त्या नव्या रूपात नव्या मालिकेत दिसणार आहेत.
NEENA KULKARNI COMEBACK IN SERIAL

NEENA KULKARNI COMEBACK IN SERIAL

ESAKAL

Updated on

मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली. चित्रपटांसोबतच छोट्या पडद्यावरही त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. नुकताच त्यांनी स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा निरोप घेतला. त्यांनी या मालिकेत जीजींची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका चांगलीच गाजलेली. मंजिरी त्यांची लेक नसून सून आहे ही गोष्ट समजताच प्रेक्षकांनी त्यांच्या अभिनयाचं आणि मालिकेचं कौतुक केलं होतं. काही दिवसांपुर्वीच जीजींनी मालिकेचा निरोप घेतला. आता त्या दुसऱ्या मालिकेत दिसणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com