

neena kulkarni
esakal
मराठमोळ्या अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी अनेक हिट चित्रपट केलेत. त्यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटही खूप काम केलं. 'सवत माझी लाडकी', 'मोगरा फुलला', ''बायोस्कोप', आई, 'उत्तरायण' असे अनेक मराठी सिनेमे त्यांनी केले. सोबतच 'हंगामा', 'नायक', 'बादल' असे अनेक हिंदी सिनेमे त्यांनी गाजवले. 'ये हे मोहब्बतें', 'देवयानी' यांसारख्या मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलं. मात्र नवऱ्याच्या निधनानंतर त्यांचं आयुष्य बदललं. नीना कुळकर्णी यांनी १९८० मध्ये अभिनेते दिलीप कुलकर्णी यांच्यासोबत लग्न केलं. मात्र, मुलांच्या जन्मानंतर काही वर्षातच दिलीप यांचं निधन झालं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्याला नवऱ्याची उणीव भासते असं त्या म्हणाल्यात.