

NEETU KAPOOR ON ALIA BHATT
ESAKAL
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली. ते दोघेही मोठे सुपरस्टार असल्याने त्यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ते दोघेही मोठ्या कुटुंबातून येतात. आलियाचे वडील महेश भट्ट बॉलिवूडचे नावाजलेले दिग्दर्शक आहेत. तर कपूर हे संपूर्ण कुटुंबच बॉलिवूडमध्ये आहे. मात्र इतकं असूनही आलिया आणि रणबीर यांनी कोणताही गाजावाजा न करता लग्न केलं. अत्यंत सध्या पद्धतीने त्यांनी घरच्याघरी लग्न केलं. तर टेरेसवर सप्तपदी आणि फोटोशूट केलं. आलियाने तर तिच्या कपड्यांनी नववधूच्या कपड्यांची सगळी संकल्पनाच बदलून टाकली. मात्र त्यांच्या लग्नात अशी एक गोष्ट घडली ज्यावरून नीतू कपूर नाराज होत्या.