

Dadi Ki Shadi Movie Review
esakal
Entertainment News : सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कौटुंबिक बंध काहीसे सैल झालेले आहेत. धावपळीच्या जीवनामध्ये कुटुंबा-कुटुंबांमधील प्रेमाची आणि आपुलकीची भावना काहीशी कमी होत चाललेली आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये आपण केवळ स्वतःचाच विचार करतो आणि आपल्या आई-वडिलांना तसेच आजी-आजोबांना विसरतो. जेव्हा आपल्याला गरज भासते तेव्हाच आपण त्यांची आठवण काढतो. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात एकाकीपणाची भावना निर्माण होते.