Ranbir Kapoor : आणि रणबीरने ठेवली पहिली कमाई आईच्या पायावर ; नीतू कपूर यांना झाले अश्रू अनावर

Ranbir Kapoor First Salary : रणबीर कपूरने त्याला मिळालेला पहिला पगार आईच्या पायावर ठेवला.
Ranbir Kapoor and Neetu Kapoor
Ranbir Kapoor and Neetu KapoorEsakal

Ranbir and Neetu Kapoor : बॉलिवूड स्टार रणबीर कपूरचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याचा अभिनय, डान्स, लुक्स याचे अनेकजण फॅन आहेत. कपूर कुटूंबातून येऊनही आपल्या उत्तम अभिनयाने रणबीरने स्वतःची एक वेगळी ओळख बॉलिवूडमध्ये बनवली आहे. रणबीरचा त्याच्या आई नीतूबरोबर असलेला बॉण्ड कायमच चर्चेत असतो. जाणून घेऊया या दोघांविषयीचा एक खास किस्सा.

मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये रणबीर कपूरने त्याच्या पहिल्या कमाईविषयी सांगितलं होतं. रणबीरने राजीव कपूर यांच्या प्रेमग्रंथ या सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा काम केलं. असिस्टंटचं काम तो यावेळी करत होता. यावेळी त्याला त्याचा पहिला पगार मिळाला जो होता फक्त २५० रुपये.

याविषयी सांगताना रणबीर म्हणाला कि,"प्रेमग्रंथ या राजीव अंकलचाय सिनेमात मी असिस्टंट म्हणून काम केलं होतं. यावेळी मला २५० रुपये पहिला पगार मिळाला होता. पगार मिळाल्यानंतर एका चांगल्या मुलाप्रमाणे मी माझ्या आईच्या खोलीत गेलो आणि तिच्या पायांवर हा पगार ठेवला. तिने ते पाहिलं आणि ती रडू लागली. ती एक सुंदर एका सिनेमात घडते तशी आठवण होती जी मी कायम जपेन. "

रणबीरने लंडनमध्ये जाऊन अभिनयाचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याने सावरिया या संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण केलं. रणबीरने त्याच्या आई-वडिलांबरोबर बेशरम या सिनेमात काम केलं होतं. पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र दिसलं होत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र फ्लॉप ठरला होता.

Ranbir Kapoor and Neetu Kapoor
Ranbir Kapoor And Alia Bhatt: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट खरेदी केली आलिशान कार; किंमत वाचून थक्क व्हाल

रणबीर आता नितेश तिवारी यांच्या रामायण या सिनेमात काम करतोय याबरोबरच तो संजय लीला भन्साळी यांच्या लव्ह अँड वॉर या सिनेमात दिसणार असून त्याच्याबरोबर या सिनेमात अभिनेता विकी कौशलही दिसणार आहे. तर रणबीरचा अनिमल हा सिनेमा खूप गाजला होता.

Ranbir Kapoor and Neetu Kapoor
Ranbir Kapoor : रणबीरच्या रामायण सिनेमाबाबत महत्त्वाची अपडेट ! 'या' ही सिनेमाचं शूटिंग करणार सुरु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com