

परदेशातला संसार सोडून भारतात का आली नेहा गद्रे?
esakal
छोट्या पडद्यावरील कलाकार एकदा लोकप्रिय झाले की ते कायमचे प्रेक्षकांच्या मनावर कोरले जातात. अशीच एक लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे. नेहाने 'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकलं. तिला या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती आणखीही काही मालिकांमध्ये आणि सिनेमात दिसली. मात्र त्यानंतर नेहा लग्न करून ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. तिने करिअरमधून ब्रेक घेतला आणि गेली सात वर्ष ती परदेशात होती. तिने २०१९ साली इशान बापट याच्याशी लग्न केलं आणि त्यांना गोंडस असा मुलगा देखील आहे. आता नेहा काही महिन्यांपूर्वीच भारतात परतली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने त्यामागचं कारण सांगितलं आहे.