

Marathi Entertainment News : जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ हा संवेदनशील मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करत असून आता या चित्रपटाने यशस्वी ५० दिवस पूर्ण केले आहेत. बॉलिवूड, हॉलिवूड व इतर प्रादेशिक चित्रपटांशी स्पर्धा असतानाही ‘तिघी’ने आपली वेगळी ओळख टिकवून ठेवत प्रेक्षकांचा विश्वास जिंकला आहे.