
tharla tar mag episode update
esakal
लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये आता नवनवीन ट्विस्ट येत आहेत. गेले २ वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. गेले २ वर्ष ही मालिका टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. काही दिवसांपूर्वी मधुभाऊंच्या केसचा निकाल लागल्यानंतर आता महीपत सुभेदार कुटुंबाच्या मागे लागलाय. महिपतने यापूर्वी सुभेदार कुटुंबाला लक्ष्य करत अस्मिताला घाबरवलं होतं. सोबतच थेट अर्जुनलादेखील जीवे मारण्याची धमकी दिली. आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. महीपत आता प्रियाला मारणार आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय.