
यापूर्वी झी मराठीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. झी मराठीने यापूर्वी अनेक उत्कृष्ट मालिका दिल्या. मात्र आता झी मराठीच्या मालिकांचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चाललाय असं दिसतंय. त्यातील एक मालिका म्हणजे 'लक्ष्मी निवास' या मालिकेत दाखवण्यात येणारे ट्विस्ट, पात्र या सगळ्यामुळे ही मालिका आता दिवसेंदिवस रटाळ आणि निरर्थक होत चाललीये. यात नुकत्याच दाखवण्यात आलेल्या प्रोमोवरून प्रेक्षकांना हसू की रडू असं झालंय. काय आहे हा प्रोमो?