
rinku rajguru
esakal
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने 'सैराट'चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. तिने 'झिम्मा २', 'कागर' यांसारख्या चित्रपटातून सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. आपल्या मेहनतीच्या जोरावर ती आज इथवर पोहोचली आहे. रिंकूबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक चाहते उत्सुक असतात.नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रिंकूने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. तिच्या या वक्तव्याचा काही नेटकऱ्यांनी विरोध केलाय. मी घरकाम करणाऱ्या टिपिकल स्त्रियांसारखी आहे असं वक्तव्य तिने केलं आहे.