
गेल्या सहा महिन्यात अनेक नव्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर काही मालिकांनी निरोप घेतला. अशीच एक नवी मालिका लोकप्रिय मराठी वाहिनी झी मराठीवर सुरू होतेय. 'होणार सून मी या घरची' मधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि मोठा आणि छोटा पडदा गाजवणारा भिनत सुबोध भावे हे दोघे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. 'वीण दोघांतली ही तुटेना' असं या मालिकेचं नाव असून याचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. नेटकऱ्यांना हा प्रोमो आवडला असला तरी या प्रोमोवर नेटकऱ्यांनी काही कमेंट केल्या आहेत.