
Bollywood News: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारे लोकप्रिय कलाकार रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी आपल्या वागण्यानेही चाहत्यांची मनं जिंकली. रितेश आणि जिनिलिया हे दोघे स्टार कपल आहेत. त्यांनी इतरांसाठी कपल गोल्स सेट केलेत. लग्नाला इतकी वर्ष होऊनही त्यांच्यातील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. बॉलिवूडसोबतच मराठी सिनेसृष्टीतही त्यांची लोकप्रियता प्रचंड मोठी आहे. त्यांच्या चाहत्यांची संख्याही खूप मोठी आहे. आता त्यांच्या ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.