

GHAROGHARI MATICHYA CHULI
ESAKAL
छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यातील मोजक्याच मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरल्यात. टीआरपी यादीत अजूनही स्टार प्रवाहच्या मालिकांचं वर्चस्व आहे. यातील एक लोकप्रिय मालिका म्हणजे 'घरोघरी मातीच्या चुली'. या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट येत आहेत. जानकी आणि ऋषिकेशच्या आयुष्यात वादळ घेऊन आणखी एक व्यक्ती येतोय. जानकीचा भूतकाळ आता तिच्यासमोर आ वासून उभा राहणार आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झालाय आणि या प्रोमोमधील नवीन व्यक्तीला प्रेक्षकांनी ओळखलंय.